विठुरायाच्या लाडू प्रसादाच्या पाकिटामध्ये चक्क आळ्या आणि लाडूला बुरशी लागल्याचा धक्कादायक प्रकार आज सोमवार दिनांक एक सप्टेंबर 2025 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास याबाबत माहिती मिळाली आहे. मंदिर समितीच्या या ढिसाळ आणि भोंगळ कारभाराविषयी भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पंढरपुरातील एका भाविकाने लाडू प्रसादाच्या पाकिटामध्ये आळ्या आणि लाडूला बुरशी लागल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल केला आहे.