सिरोंचा वनविभागाच्या आसरअल्ली परिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी राबविलेल्या धडक कारवाईत सागवान तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक करून ६.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात तेलंगाना TS १२UB ३२६२ क्रमांकाची एक XYLO कार आणि दहा सागवान लठ्ठ्यांचा समावेश आहे. गुरुवारी पहाटे कोपेला-सोमनपल्ली जंगलातून सागवानाची अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर हा सापळा रचण्यात आला.