गेल्या काही दिवसापासून तालुक्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सोयाबीन कपाशी तुर यासारखी खरीप पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने तत्काळ मदतीची घोषणा करून हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी होत आहे.नेर तालुक्यातील शिरजगाव कोलूरा व परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती जलमय झाली असून सोयाबीन पिकाला कोंब फुटल्याने ती...