मराठा आरक्षणासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर मनोज रंगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, आमदार रोहित पवारच मराठा आरक्षणाचे आंदोलन हाताळत असून त्यांना मुंबईमध्ये दंगल घडवायची आहे, असा आरोप भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव माऊली हळनवर यांनी केला आहे. आज रविवार दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी दोन वाजण्याची समाधान सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ शेअर करत त्यांनी याबाबत आरोप केले आहेत. त्याचबरोबर धनगर समाजबाबत मनोज जारंगे पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे त्यांनी सांगितले.