सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पाथरी उपवन क्षेत्रातील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर हल्ला करून ठार करणाऱ्या वाघाचे परिसरात हल्ले सुरूच आहे शुक्रवारी त्या वाघाने एका बैलावर हल्ला करून ठार केल्याचे परिसरात लावलेल्या ट्रॅप कॅमेरा दिसून येत आहे त्या वाघाला जेर बंद करण्यासाठी गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी मागणी केली आहे