वलगांव पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या शिराला ग्रामात आठवडी बाजारात शनिवारी संध्याकाळी जुन्या वादातून एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. यात सचिन रमेशराव पाटील हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिनचा भाऊ चेतन पाटील (३१) याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शिराला ग्रामातील गजानन गवळी यांच्या दुकानासमोर आरोपी वैभव उर्फ राजेंद्र श्रीकृष्ण म