मुर्री ते ढाकणी मार्गावरील शेतशिवार परिसरातील निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना 25 ऑगस्ट रोजी दुपारी साडेअकरा वाजता उघडकीस आली मृत महिला 50 ते 55 वर्ष वयोगटातील आहे ढाकणी येथील पोलीस पाटील माया शंकर चौधरी यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे तिची हत्या की आत्महत्या हे अध्याप स्पष्ट झाले नाही