जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरामध्ये अवैधरित्या गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजविणाऱ्या एका संशयीत आरोपीला रामानंदनगर पोलिसांनी शनिवारी 13 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता अटक केली आहे. याबाबत सायंकाळी 6 वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.