शहरात चालणाऱ्या अवैध व्यवसायांपासून ते गुन्हेगारी जगतावर आपली जरब बसविणाऱ्या ठाणेदार संग्राम पाटील यांना ऐन सणासुदीच्या दिवसांत चोरट्यांनी आव्हान दिले. २२ ऑगस्ट रोजी पोळ्याच्या दिवशी दिवसाढवळ्या शहरातील जुनेगाव हिंदू स्मशानभुमीजवळ घर फोडून चोरट्यांनी ऐवज चोरून नेला. शहरातील बालाजी अर्बन पतसंस्थेमध्ये कार्यरत असलेले सुनील शिंदे कर्तव्यावर गेले होते. तर शिक्षक पत्नी अश्विनी शाळेत गेल्या होत्या. २२ ऑगस्ट रोजी दुपारी चोरट्यांनी घरावर हात साफ केला.