बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस प्रशासनाने २७ सप्टेंबर रोजी संयुक्त कारवाई करत मलकापूर शहर व एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील धरणगाव व रणथम परिसरातील दोन अवैध बायोडिझेल पंपांवर धाड टाकली. या धाडीत जमिनीत पुरलेल्या टाक्यांमध्ये डिझेल सदृश्य द्रव्य साठवून त्याची बेकायदेशीर विक्री होत असल्याचे आढळले. या प्रकरणी पुरवठा निरीक्षक कु. धनवर्षा हरणे यांच्या तक्रारीवरून मो.नईम शेख, शाकीर खान, लखन पांचाळसह ८ जणांविरुद्ध मलकापूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.