गणेश लालबाबु राम, वय २६ वर्षे, रा. संत लहुजी नगर, हे पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. हद्दीत पुष्पा इंटरप्रायजेस समोर, हिंगणा रोडचे कडेला बाथरूम करून येत असता, बोलेरो मालवाहक गाडी क. एम.एच. ४० बि.जी. ७८२० चा चालक नामे योगेश पांडुरंग मेश्राम, वय २७ वर्षे, रा. गजानन नगर, झोन चौक, एम.आय.डी. सी., नागपूर याने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने, निष्काळजीपणे व धोकादायकरित्या चालवुन गणेश यास धडक दिली. अपघातामध्ये गणेश गंभीर जखमी झाले.