मुंब्रा येथील गाझी दरबार हॉटेलमध्ये जेवायला आलेल्या काही जणांनी गाझी दरबार हॉटेलमधील स्वयंपाकी वर क्रिकेट बॅटने हल्ला केला व त्याला बेदम मारहाण केली आहे. सूप तयार होत असलेल्या वासावरून आणि इतर संबंधित मुद्द्यांवरून वाद झाल्यानंतर ही घटना घडल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार मारहाण करणारे हे तरुण राबोडी परिसरातले आहेत. ही घटना आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी रात्री 1 च्या सुमारास घडली असून अद्याप पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याचं वृत्त आहे.