महाबोधी महाविहार मुक्त झाला पाहिजे यासाठी नागपूर ते चैत्यभमी पर्यंत भंते विनायचार्य यांनी काढलेली पंचशील धम्म ध्वज जनसंवाद यात्रा ही शनिवार दि. 23 ऑगस्ट 2025 रोजी जालना शहरात दाखल झाली. दरम्यान या यात्रेचे जालन्यात जंगी स्वागत करण्यात आले. दुपारी 1 वाजता निघालेली पदयात्रा ही मंठा चौफुली, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पाणी वेस, मस्तगड येथे दाखल झाली.तिथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन रॅली गांधी चमन,शनिमंदीर मार्गे अंबड चौफुली येथे 4 वाजेच्या सुमारास दाखल झाली.