तुमसर पंचायत समितीचे माजी सभापती नंदू राहांगडाले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी खासदार प्रफुलभाई पटेल यांनी पक्षाचा दुपट्टा देत स्वागत केले. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक बळकट होणार असून स्थानिक पातळीवर पक्षाला निश्चितच नवी ऊर्जा आणि बळकटी मिळणार आहे. नवीन सहकाऱ्यांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत करून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रसंगी आमदार राजु कारेमोरे उपस्थित होते.