ग्राम रोजगार सहायक संघटना गोरेगाव च्या वतीने तहसिलदार गोरेगाव व गट विकास अधिकारी गोरेगाव यांना कामबंद आदोलनाबाबत दि. 12 सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले. निवेदनात ग्राम रोजगार सहाय्यक यांना मार्च ते ऑगस्ट 2025 पर्यंत असे सलग सहा महिण्यापर्यंतचे मानधन मिळालेले नाही. परिणामी सर्व ग्राम रोजगार सहायकावर उपासमारीची वेळ आली आहे. ग्राम रोजगार सहाय्यक कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होईल असा प्रश्न या निमित्त निर्माण झाला आहे.