आज शनिवार दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी कळमेश्वर तालुक्यातील तेलगाव, दाढेरा, तिडंगी, माळेगाव (जोगा), नंदगोमुख, सालई या गावात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानाची सावनेर-कळमेश्वर क्षेत्राचे आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी पाहणी केली. या वेळेस शासनाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले तसेच झालेल्या नुकसानाची माहिती शासनाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली.