सेवा सहकारी संस्था, हनवतखेडा येथील नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार सोहळा दर्याबाद येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मेळघाटचे लोकप्रिय आमदार केवलराम काळे उपस्थित होते. या प्रसंगी आमदार काळे यांच्या हस्ते संचालक सदस्यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात त्यांनी नव्या संचालक मंडळास आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा देत शेतकरी व ग्रामीण जनतेच्या हितासाठी संस्थेच्या माध्यमातून पारदर्शक व विकासाभिमुख काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास गावातील मान्यवर, शेतकरी