मोरारी बापू यांच्या वाणीतून रामकथा ऐकण्याची संधी आपणा सर्वांना प्राप्त झालेले आहे. पिढ्यानपिढ्या आपण राम कथा ऐकत आलेलो आहोत, मात्र मोरारी बापू यांच्या वाणीतून राम कथा ऐकणे, हे सहस्त्रनाम ऐकण्याचे सौभाग्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मोरारी बापू यांच्या राम कथा प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे.