मराठा आरक्षणाबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज बुधवार दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ च्या सुमारास मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, ओबीसीसाठी एक समिती आणि उपसमिती स्थापन करण्याचा विचार गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळात सुरू आहे. मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आज या समितीच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. मला विश्वास आहे की पुढे जाऊन, ओबीसीशी संबंधित कोणत्याही समस्या या समितीद्वारे सोडवल्या जातील.