माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात मूर्ती विसर्जनाच्या सोयीच्या दृष्टीने सुरु करण्यात आलेल्या 3 फिरत्या विसर्जन रथाचे आज आयुक्त तथा प्रशासक श्री. विपीन पालीवाल यांच्या हस्ते फीत कापुन उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी उपायुक्त श्री. मंगेश खवले, उपायुक्त श्री. संदीप चिद्रवार, मुख्य लेखा परीक्षक श्री. मनोज गोस्वामी, सहायक आयुक्त श्री. अनिलकुमार घुले, श्री. नरेंद्र बोबाटे, डॉ. नयना उत्तरवार, डॉ. अमोल शेळके, उपअभियंता श्री. रवींद्र कळंबे उपस्थित होते.