मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांसाठी आरक्षण मिळवून इतिहास रचला आहे. आतापर्यंत कोणत्याही मराठा मुख्यमंत्र्याला हे जमले नव्हते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी संविधानाच्या चौकटीत बसवून हे काम करून दाखवले. मराठ्यांसाठी झटणारा आणि त्यांना न्याय देणारा नेता म्हणून त्यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल, अशी प्रतिक्रिया भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चित्रा किशोर वाघ यांनी मंगळवार, २ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ९ च्या सुमारास दिली.