गराडा, पिशोर आणि बिस्मिल्ला कॉलनी, शिवनगर (कन्नड) येथील अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात मदन राठोड, सावन निवृत्ती मोकासे आणि आयन खाजू शेख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दु:खद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात प्रशासन आणि स्थानिक समुदाय सहभागी असून शासनातर्फे प्रत्येक कुटुंबीयाला ४ लाख रुपयांचा मदतनिधीचा धनादेश आमदार संजना जाधव यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला. प्रशासनाने आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी मदत तसेच आवश्यक ती सुरक्षा उपाययोजना सुनिश्चित केली.