साकोलीतील स्टॉप इन हॉटेल येथे रविवार दि. 24 ऑगस्टला दुपारी1 ते रात्री7या वेळात देवी इंटरटेनमेंट तर्फे हिंदी चित्रपट अकाल मृत्यू यासाठी दिग्दर्शक पराग टेंभुर्णे प्रोड्युसर देवी कोटांगले, प्रोड्युसर मुन्ना पाटील यांनी चित्रपटातील विविध भूमिकांसाठी कलाकारांच्या मुलाखत व ऑडिशन्स घेतल्या.महिला कलाकार, पुरुष कलाकार व बालकलाकार मोठ्या संख्येने ऑडिशन देण्यासाठी उपस्थित होते. या चित्रपटात ग्रामीण भागातील कलाकारांना संधी दिली जाणार असल्याचे दिग्दर्शक पराग टेंभूर्णे यांनी सांगितले