कोणतीही कंपनी कितीही मोठ्ठी असली तरी तीला गौण खनिजाच्या अनुषंगाने ठोठावलेला दंड हा भरावाच लागणार आहे. तत्कालीन महलुसलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यावर स्थागीती दिली होती. त्यात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा काहीही सहभाग नाही, परंतु, रोहीत पवार यांनी यांच्यावर दंड माफ केल्याचा आरोप खोटा आहे, त्यामुळे रोहीत पवार आता राजकीय सन्यास घ्यावा असा टोला माजीमंत्री आ. बबनराव लोणीकर यांनी लगावलाय. मंगळवार दि.9 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.