चाळीसगाव: गणेशोत्सवाच्या समाप्तीनंतर गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी चाळीसगाव नगरपरिषदेने यावर्षी विशेष पुढाकार घेतला आहे. शहरातील विविध भागांत गणेशमूर्ती संकलन केंद्रे (Ganpati Murti Sankalan Kendra) आणि कृत्रिम विसर्जन तलावांची (Artificial Pond for Visarjan) व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन करणे शक्य होणार आहे.