नांदुरा तालुक्यातील वसाडी येथील कृषी नगरात घरगुती सिलेंडरचा अचानक स्फोट होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज 9 सप्टेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता च्या दरम्यान मोहन वसंता बोदळे यांच्या राहत्या घरी घडली आहेत. यामध्ये जीवनावश्यक वस्तूसह, नगदी रुपये, सोने चांदी, जळून खाक झाले असून अंदाजे चार लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मोहन बोदडे यांनी दिली. सुदैवाने यामध्ये कोणतेही जीवित हानी झालेली नाही.