गोंदिया जिल्ह्यातील तालुक्यातील मौजा हिरडामाली येथे शतकानुशतकांपासून चालत आलेल्या पारंपरिक प्रथेनुसार यंदाही पोळ्यानंतर पाडव्याच्या दिवशी पहाटे चार वाजता मार्बत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. परंपरा अबाधित ठेवत गावातील हौशी युवक व नागरिकांनी हनुमान मंदिर परिसरात भव्य मार्बत प्रतिमा उभारली. संपूर्ण गावातून बँड व डीजेच्या गजरात “जागे मार्बत” व “ढेकूण मोंगसा घेऊन जा मार्बत” या जयघोषांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.