आज दि.24 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील पारध येथे दिनांक 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास शनिवारी हृदयद्रावक घटना उघडकीस आली. कौटुंबिक वादातून समाधान अल्हाट (वय अंदाजे ३०) यांनी पत्नी कीर्ती (वय अंदाजे २५) हिच्या डोक्यात धारदार पाहर घालून हत्या केली व त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. सादर घटना स्थळी सहा.पोलीस निरीक्षक संतोष माने व पोलीस उप निरिक्षक वाल्मीक नेमाने यांनी भेट दिली. पुढील तपास पोलीस करत आहे.