बुलढाणा शहरातील विष्णूवाडी येथील गजानन महाराज मंदिर परिसरात 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता मोरया प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळा तर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.