राहेरा येथील शाळकरी मुलांनी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आमदार संजय गायकवाड यांची भेट घेऊन बस वेळेवर न येणे, बसमध्ये जागेअभावी कंडक्टरकडून होत असलेला त्रास याबाबतची व्यथा मांडली. शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क असून त्यात अडथळा येऊ नये, यासाठी आमदार संजय गायकवाड यांनी तत्काळ विभागीय परिवहन नियंत्रकांना दूरध्वनी करून आवश्यक सूचना दिल्या.