खेड तालुक्यातील पाळू येथील शेतकरी कुटुंबातील अश्विनी बाबुराव केदारी (वय ३०) हिने २०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावून राज्यभर नावलौकिक मिळवला होता.परंतु, गेल्या महिन्यात घडलेल्या अपघातानंतर सुरू असलेली तिची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली.