उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्य रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले होते,छत्रपती शिवाजी महाराज चौकातील खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन करू अशी मागणी मनसे व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती अनेक वृत्तपत्रातूनही बातम्या प्रकाशित झाल्या होत्या,अखेर प्रशासनाने उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्याचे काम प्रशासनाने २ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा सुरू केले आहेत.