Download Now Banner

This browser does not support the video element.

कन्नड: नाचनवेल येथील मुस्लिम व बौद्ध समाजाचा मराठा आंदोलनाला पाठींबा

Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 31, 2025
आज दि ३१ ऑगस्ट रोजी सांय ५ वाजता नाचनवेल येथील मुस्लिम व बौद्ध समाज बांधवांनी मुंबईत सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला जाहीर पाठींबा दिला आहे. आरक्षणासाठी मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना झाले असून शासनाकडून सकारात्मक भूमिका न घेतल्याने आंदोलन सुरूच आहे. आंदोलकांसाठी खानपानाची सोय व्हावी म्हणून गावागावातून मदतीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत नाचनवेल ग्रामस्थांनी धान्य एकत्रित करून तब्बल 15 क्विंटल पुरी-भाजी तयार केली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us