खेड तालुक्यातील खेड रेल्वे स्थानक ते एसटी बस स्थानक दरम्यान रिक्षाने प्रवास करताना एका महिलेच्या पर्समधून सुमारे १ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञातने चोरून नेण्याची घटना रविवार २४ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.