मुंबई - चिपी विमानसेवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या आणि त्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. ही विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून यासाठी शासनाने उडान च्या धर्तीवर आरसीएस फंडिंग चा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी अशा सूचना मुंबई येथील बैठकीत आपण संबंधित विभागाला दिले आहे, अशी माहिती मत्स्य व्यवसाय व बंदरे तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंगळवार 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता दिली.