साकोली तालुक्यातील शंकरपूर येथील अंगणवाडी मदतनीस ची भरती रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या सहा महिन्यापासून शंकरपूरच्या नागरिकांनी आंदोलन निवेदन केली.शासनाच्या संबंधित विभागाने दखल घेत भरती प्रक्रिया रद्द केल्याने गावकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याने गावकऱ्यांनी गुरुवार दि. 31 जुलैला सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद शाळेत एकत्र येत विजयोत्स साजरा केला तसेच या आंदोलनाला सहकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राजकीय नेते यांचा सत्कार देखील गावकऱ्यांनी केला.