गडचिरोली : तालुक्याच्या बोदली येथील गावाजवळ दोन दिवसांपूर्वी सकाळी गावातील काही युवकांना वाघ मुक्त संचार करताना दिसून आला.वाघ अचानक रस्ता ओलांडताना पाहून युवकांची घाबरगुंडी उडाली. बोदली येथील काही युवक पोलिस भरतीची तयारी करीत असल्याने ते शुक्रवारी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास गडचिरोली धानोरा राष्ट्रीय महामार्गाने धावत जात होते. दरम्यान, वाघाने शेतशिवारातून जंगलात प्रवेश केला. हा वाघ रात्रीच्या सुमारास कठाणी नदी परिसरातील शेतशिवाराकडे गेला असावा.