घोड-भीमा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा – आमदार विक्रम पाचपुते यांचे आवाहन अहिल्यानगर : धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे घोड नदी व भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. यामुळे नदीकाठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार विक्रम पाचपुते यांनी नागरिकांना आवाहन केले की, “नदीकाठावरील सर्व ग्रामस्थांनी सतर्क राहावे, प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व कुठल्याही प्रकारचा धोका पत्करू नये.”