मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अखेर यश मिळाले असून सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील बस स्थानक परिसरात मराठा बांधवांनी मोठ्या आनंदात जल्लोष साजरा केला. गुलाल उधळत, फटाक्यांची आतषबाजी करत आणि ढोल-ताशांच्या गजरात आंदोलकांनी आपला आनंद व्यक्त केला.