कळंब तालुक्यातील मोहा शिवार येथे स्मशानभूमीच्या जागेच्या वादातून २६ ऑगस्ट रोजी मोठा गोंधळ उडाला. या वेळी फिर्यादी रमेश काळे यांना सव्वाशेहून अधिक जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सर्व आरोपींवर अॅट्रॉसिटी कायदा आणि इतर कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.