वैराग परिसरात वाघाने गेल्या तीन दिवसांपासून दहशत माजवली आहे. ढोराळे, पिंपरी आणि आता उपळे येथे वाघाने पाळीव प्राण्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारल्यामुळे शेतकरी आणि पशुपालक प्रचंड धास्तावले आहेत. शुक्रवारी रात्री उपळे येथील शेतकरी अण्णासाहेब तांबारे यांच्या म्हशीवर वाघाने हल्ला केला. शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास त्यांचा मुलगा शेतात गेल्यावर ती मृतावस्थेत आढळून आली. गळ्यावर आणि शरीरावर गंभीर जखमा होत्या आणि आसपास वाघाच्या पंजाचे मोठे ठसेही आढळले आहेत.