सिरोंचा तालुक्यातील बामणी, जाफराबाद, रेगुंठा, सिरकोंडा, झिंगानूरसह अनेक गावांमध्ये युरियाचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. धान, कापूस, मका, मिरची, सोयाबीन यांसारख्या पिकांना खताची नितांत गरज असताना शेतकरी हवालदिल झाले आहेत.आविसं तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम, विविध सरपंच व शेतकरी यांनी कृषी विभागाने खत उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली आहे.