उदगीर तालुक्यातील धडकनाळ बोरगाव येथे १८ ऑगस्ट रोजी ढग फुटी सदृश्य पावसामुळे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे,अनेक शेतकऱ्यांचे जनावरे वाहून गेली,शेती नापीक झाल्या,गावांतील घरांची पडझड झाली,या दोन गावाना महापूरचा फटका बसला असून या दोन गावांसाठी विशेष मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,गावाजवळ लागून असलेल्या नदीचे सरळीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून नुकसान ग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती आमदार संजय बनसोडे यांनी दिली