राहुरी शहरातील स्टेशन रोड ते मेहेत्रे मळा दरम्यान असलेल्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. तसेच रस्त्याच्या पुर्व-पश्चिमेकडून अतिक्रमणे झाल्यामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे.त्यामुळे रस्त्यावरून दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत होत असून या रस्ता दुरुस्तीची मागणी लाभधारक महिलांनी केली आहे. अन्यथा नगरपरिषद कार्यालया समोर तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल अशा याबाबत आज सोमवारी सायंकाळी येथील महिलांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या आहेत.