थेऊर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पावर हाऊस जवळ असलेल्या नदीपात्रात एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची घटना आज शुक्रवारी (ता.12) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.या घटनेमुळे थेऊरसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर अनोळखी व्यक्तीची ओळख पटविण्याचे लोणी काळभोर पोलिसांसमोर आव्हान आहे.