धुळे शहरातील पांझरा नदीपात्रात आज भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जन होत आहे. महापालिकेने ११ ठिकाणी संकलन केंद्रे, तर मोठ्या मूर्तींसाठी हत्तीडोह येथे विशेष व्यवस्था केली आहे. सुरक्षेसाठी राज्य आपत्ती दलाचे ४ अधिकारी, ३४ जवान, पोलिस व महापालिकेची पथके तैनात आहेत. नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने नागरिकांनी नदीत उतरू नये, असे प्रशासनाचे आवाहन असून नागरिक संकलन केंद्रांवर मूर्ती दान करत आहेत.