गणेश उत्सव काळात कोकण वासियांना कुठल्याही वाहतूक समस्येला सामोरे जावे लागू नये याकरिता मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणेश उत्सव काळात तीन दिवस चिपळूण पनवेल दरम्यान अनारक्षित मेमू विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा कोकणात गणेश उत्सवासाठी येणाऱ्या असंख्य प्रवाशांना होणार आहे.