प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या हस्ते आज गुरुवारी दुपारी १२.३० च्या सुमारास जेएन पोर्ट-पीएसए मुंबई टर्मिनल फेज-२ चे हैद्राबाद हाऊस, नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झाले. तर या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगड जिल्ह्यातील जेएन पोर्ट-पीएसए मुंबई टर्मिनल फेज-२ उरण येथे उपस्थित होते. यावेळी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल दूरदृश्य प्रणालीद्वारे, तर खासदार श्रीरंग बारणे उपस्थितीत होते.