महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वसई येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास मनसे पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मार्गदर्शन केले. आगामी पक्ष बांधणी, संघटनात्मक बांधणी आदींसह इतर विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आल. नायगाव चंद्रपाडा परिसरातील नागरिकांनी यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनसेचे वसई विरार परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.