मित्रांची मजाक करणे एकाच्या चांगलेच अंगलट आले. चार जणांनी संगनमत करून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना ता. 22 शुक्रवारी रात्री 11.30 वाजता तालुक्यातील सुकळी बाई येथे घडली. याप्रकरणी किशोर सुरेश उमक वय 37 यांच्या फिर्यादीवरून तन्मय धुर्वे, विष्णू येलोरे, टिप्पू नरताम व नूर यांचा जावई नाव माहीत नाही. अशा चार जणांविरुद्ध ता. 23 ला सायंकाळी 5.30 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती ता. 24 ला सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.